नारायणगाव प्रतिनिधी

गेले अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या जुन्नर रोडच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. अंतर्गत वाद विवादामुळे या रस्त्याचे काम खोळंबले होते. माजी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून नारायणगाव एसटी स्टँड पासून ते डॉक्टर खैरे हॉस्पिटल पर्यंत सातशे मीटरच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मागील वर्षी झाले होते. त्यात डॉक्टर खैरे हॉस्पिटल ते ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पर्यंत तीनशे मीटरचे रस्त्याचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील डॉक्टर डोळे हॉस्पिटल ते पूर्ववेशी पर्यंतचे काम हे अनेक महिन्यांपासून रखडले होते. या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडी व साथीचे आजार यासारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या परंतु मागील आठवड्यापासून हे काम पुन्हा सुरू झाले असून स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे काम लवकर मार्गी लागू शकते. तिसऱ्या टप्प्यात पूर्ववेस ते पुणे नाशिक महामार्गापर्यंत 100 मीटरचे काम मार्गी लागणार आहे. ऐन पावसाळ्यात सुरू झालेले हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने शीघ्र गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ उडू शकते. या रस्त्याच्या कामासंदर्भात पत्रकार रवींद्र कोल्हे यांनी वेळोवेळी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासोबत या कामाचा पाठपुरवठा केला होता पत्रकार कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर या कामाला मुहूर्त मिळाला आहे.



