सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी येथे विद्यार्थ्यांना वारकरी सांप्रदायाची ओळख,आषाढी वारी,महाराष्ट्रातील संतांचा परिचय व्हावा या हेतूने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थी विठ्ठल रूखमाई, विविध संतांच्या वेशभूषेत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामघोषात तल्लीन झाले.शालेय परिसरात पालखीसह निघालेल्या या दिंडीत पूर्व प्राथमिक हे इयत्ता दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडांगणावर नेत्र दीपक रिंगण देखील साकारले. यावेळी विविध नृत्य, भजन, किर्तन,अभंग,भारुड,विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या मार्गावर विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी रांगोळ्या साकारल्या व फुगड्या घातल्या. संपूर्ण परिसर हा विठ्ठल नामघोषाने भक्तिमय झाला होता. या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त श्री.सचिन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.पालखीचे पूजन सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य श्री बलराम सर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन डेरे, उपमुख्यध्यापक रिजवाना शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी वारीमुळे मनुष्याचे जीवन घडते, मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते, जनसामान्यांमध्ये बंधुभाव रुजतो असे प्रतिपादित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक गणेश शिंदे यांनी केले तर शिक्षिका आलिया जमादार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.




