नारायणगाव, दि. १३ (सा. वा.)- जुन्नर विभागात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने जुन्नर विभागात पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी एका इसमाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर खोडद येथील जितेंद्र रोहिदास पानमंद (रा. पानमंद मळा, खोडद) याला जीएमआरटी चौक येथे ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्याकडे गावठी पिस्तूल मिळाले असून, त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायकपोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक पोलीस फौजदार दीपक साबळे, हवालदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले यांनी ही कारवाई केली.




















