नारायणगाव,प्रतिनिधी
रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या वतीने शिव प्रेरणा संस्थेची आश्रम शाळा कोळवाडी मध्ये
डॉक्टर्स डे, सीए डे, फारमर्स डे. निमित्ताने ,प्रगतशील शेतकरी , व सेवाभावी डॉक्टर्स , नामांकित सी ए यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला तसेच. आरोग्य शिबिर घेण्यात आले 280 मुला मुलींची तपासणी करून त्यांचे . शरीरा मधील हिमोग्राम व थालसेमिया अशा दुर्लक्षित व गंभीर आजाराची एच बी इलेक्ट्रॉफोरसिस अशी महागडी रक्त तपासणी मोफत करण्यात आली.
ह्या आजरा संबंधी असणारे धोके व उपाय मार्गदर्शन माहिती रोटरी अध्यक्ष रोटेरीयन डॉ उत्तम घोरपडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी रोटरी चे माजी अध्यक्ष ॲड.अरुण गाडेकरसाहेब होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी प्रोजेक्ट डायरेक्टर सौ मंदाकीनी दांगट मॅडम यांनी केले.
6 वी ते 12 च्या मुलींना डॉ.सौ गुळवे मॅडम यांनी लैंगिक शिक्षण तसेच आरोग्य विषया वरती व्याख्यान दिले.
तसेच डॉ सौ अर्चना सराईकर मॅडम व किर्ती घोरपडे मॅडम यांनी आजारा पासून कसे दूर रहायचे या वर मार्गदर्शन केले.रक्त तपासणी साठी श्री सावकार साळवी व मिस साक्षी घुले यांनी सहकार्य केले सर्व रोटरी क्लब पदाधिकारी सचिव रो हनुमंतराव भंडारी, प्रोजेक्ट इन्चार्ज रो शामराव थोरात. रो API सुकाजी मुळे साहेब
रो रामभाऊ सातपुते सर, रोटरी चे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब ढमाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पाटीलसर यांनी केले
तसेच प्राचार्य गायकर सर मुख्याध्यापक गावंदे सर सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली.




