वडगाव आनंद:वार्ताहर
आळेफाटा(ता.जुन्नर) येथील श्री संत शिरोमणी सावतामहाराज पुण्यतिथी व संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त गुरुवार (दि.17) पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेआळेफाटा येथील गेली 42 वर्षांची परंपरा कायम राखत श्री संत शिरोमणी सावता महाराज देवस्थान ट्रस्ट आळेफाटा, वडगाव आनंद, पादीरवाडी व मुंबईकर मंडळी यांचे वतीने संत सावता महाराज पुण्यतिथी व संत नामदेव महाराज समाधी सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये सकाळी काकडा, विष्णु सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी हरिपाठ, रात्री किर्तन, महाप्रसाद व जागर आदि दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहात ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख,ज्ञानेश्वर माऊली लंगोटे,कबीर महाराज आत्तार,वैष्णवी सरस्वती दीदी,संग्राम बापू भंडारे,गणेश महाराज शिंदे,ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांची कीर्तन होणार आहेत.बुधवार(दि.23)रोजी भव्य दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तर गुरुवार(दि.24) रोजी ह.भ.प. बजरंग महाराज कर्जुलेकर यांच्या होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.




