बेल्हे प्रतिनिधी – 29 ऑगस्ट
गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी समर्थ कॉलेज बेल्हे या ठिकाणी पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी येथील विद्यार्थी कु.दिव्यांश रुस्तम भारद्वाज याने ५२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक संपादित केला. समर्थ कॉलेज येथे १४,१७,१९ वर्ष मुले,मुली यांच्या कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात दिव्यांश भारद्वाज यांनी ही कामगिरी केली आहे.सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री गणेश शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले. संस्थेचे खजिनदार श्री.सचिन चव्हाण, मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी या विद्यार्थ्याचे कौतुक केले. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी सदर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.




















