आळेफाटा | आळे (ता.जुन्नर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमिला बबनराव शिरतर (वय ८२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुली, सुन, नातवंडे, असा परिवार आहे. प्रमिला शिरतर यांनी शैक्षणिक क्षेत्रात व तसेच सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने कामाचा ठसा उमटवला होता. त्या निमगावसावा येथील पंडित नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा चव्हाण, प्रा.रवींद्र शिरतर, पत्रकार जयवंत शिरतर यांच्या मातोश्री होत.



