नारायणगाव, प्रतिनिधी
२६ जुलै २०२५ रोजी ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातएनसीसी कॅडेट्ने कारगिल विजय दिवस उत्सहात साजरा केला. यात भित्तिपत्रक (पोस्टर सादरीकरण) साठी ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . या कार्यक्रमाचे नियोजन सिनियर अंडर ऑफीसर अभिषेक रसाळ, सिनियर अंडर ऑफीसर उन्नती कोळेकर,ज्युनिअर अंडर ऑफीसर अवधुत कुलकर्णी, ज्युनिअर अंडर ऑफीसर तेजस खोपडे, ज्युनिअर अंडर ऑफीसर भाग्यश्री खरमाळे यांनी केले. आणि या कार्यक्रमाची प्रास्तविक सिनियर अंडर ऑफीसर अभिषेक रसाळ ह्यांनी केले,व प्रमुख उपस्थिती असलेले माजी सैनिक कॅप्टन उमेश अवचट ह्यांनी कारगिल विजय दिवस संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ह्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, कार्यालयीन अधीक्षक.कुलकर्णी सर, प्रा सुभाष कुडेकर डॉ.शिवाजी टाकळकर , डॉ.अनिल काळे डॉ.शरद काफले आणि डॉ. अशोक कानडे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शनामध्ये माननीय कॅप्टन उमेश अवचट यांनी कारगिल युद्धाची माहिती सांगितलीसोबतच कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचा युद्धभूमीत पराभव केला या विषयी ज्युनिअर अंडर ऑफीसर अवधुत कुलकर्णी व कॅडेट नशरा मलिक यांनी माहिती दिली कारगिल युद्ध है भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ साली लढले गेलेले युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित होती. तसेच या पूर्वीच्या भारत-पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरु झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. सन १९९९च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. 1999 च्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचा युद्धभूमीत पराभव केला होता. हे कारगिल युद्ध 60 दिवस चालले आणि 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानचा पराभव केला, ज्याला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले. हा विजय मिळवताना भारतीय लष्कराचे अनेक जवान शहीद झाले. म्हणून, भारत सरकारने ठरवले की कारगिल विजय दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी भारतीय सैन्याचा शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी महाविद्यालयाने रौप्य महोत्सव म्हणून हा दिन कारगिल विजय दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या शुभेच्या दिल्या. आणि यामध्ये शिक्षक, कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होते आणि एनसीसी चे ६० कॅडेट्ने सक्रीय सहभाग घेतला होता. प्रमुख पाहुण्यांचे आभार सिनियर अंडर ऑफीसर उन्नती कोळेकर यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय छात्रसेना गीताने झाली ,या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील छात्र सेना प्रमुख कॅप्टन व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिलीप शिवणे यांनी केले..




