राजुरी, दि. १८ ऑगस्ट
राजुरी येथील सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल येथे देशाचा ७९ वा स्वातंत्रता दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. महारिया चारिटेबल ट्रस्टचे सदस्य डॉ.नागेश आसपात यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी महारिया चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री.किशोर पटेल, खजिनदार श्री.सचिन चव्हाण, सदस्य डॉ.करसन भानुशाली, सह्याद्री व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय झोपे, उपप्राचार्य श्री.बालरामडू आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर नृत्य, भाषणे, समूहगीते, मानवी मनोरे, कराटे प्रात्यक्षिके सादर केली. शाळेच्या विद्यार्थिनी कु.आराध्या भारती, कु.संस्कृती कुऱ्हाडे, कु.सान्वी बोरचटे, कु.शर्वरी नायकोडी यांनी यावेळी आपली मनोमते व्यक्त केली.यावेळी बोलताना श्री भानुशाली यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे, स्वातंत्र्यवीरांनी दिलेल्या बलिदानाचे आपण स्मरण ठेवले पाहिजे, संविधानाने प्रदान केलेल्या मूलभूत हक्कांप्रमाणेच मूलभूत कर्तव्य सुद्धा प्रामाणिकपणे बजावली पाहिजेत असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका सौ सीमा पाडेकर, सौ,सुप्रिया गुंजाळ,सौ आलिया जमादार, सौ आश्विनी पाचपुते, सौ तेजस्विनी कोल्हे, कु.फिजा चौगुले, कु.अल्फीया इनामदार, श्री गणेश शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका सौ सफिना शेख यांनी केले.






















