राजुरी:वार्ताहर ( शनिवार दि. २३ऑगस्ट)
सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक २२ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत यश संपादन केले आहे. या स्पर्धा समर्थ कॉलेज बेल्हे येथे संपन्न झाल्या. त्यात १४ वर्षाखालील मुले या गटात दिव्यांश भारद्वाज याने द्वितीय, सागर गाडगे याने द्वितीय तर स्वराज रवींद्र जाधव याने तृतीय क्रमांक संपादित केला.१४ वर्षाखालील मुली या गटात सान्वी अमोल बोरचटे हिने द्वितीय क्रमांक तर संस्कृती शेखर कुऱ्हाडे हिने तृतीय क्रमांक संपादित केला असून १७ वर्ष वयोगट मुले या गटात जिशान इमरान शेख याने तृतीय क्रमांक तर सोमीयो शंतनू चौधरी देखील द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले असून शाळेचे खजिनदार श्री.सचिन चव्हाण व मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.




















