नारायणगाव प्रतिनिधी
ग्रामोन्नती मंडळाचे आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नारायणगाव, पुणे येथील वाणिज्य विभाग व वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच प्राध्यापक गुणवत्ता सुधार चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात गोवा येथील कुंकोलीम एज्युकेशन सोसायटीचे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. ब्रह्मा एडविन बरेटो, डॉ. अविनाश रायकर, डॉ. सुरज पोपकर आणि प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले अशी माहिती वाणिज्य व संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ. जे.पी. भोसले यांनी दिली. सदर चर्चासत्रात प्राचार्य डॉ. ब्रह्मा एडवीन बरेटो यांनी उच्च शिक्षणात प्राध्यापकांनी सतत शिकत राहणे गरजेचे आहे यावर भर दिला.
डॉ. अविनाश रायकर यांनी उच्च शिक्षणातील संशोधनाचे महत्व विषद करतानाच दर्जे दार संशोधनासाठी विश्लेषणाच्या डेटा पद्धती सविस्तरपणे नमूद केल्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शोध-निबंध लिहिण्याच्या कला व तंत्र डॉ. सुरज पोपकर यांनी सांगितले तर कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक आणि प्रशासकीय कौशल्ये, सामूहिक प्रयत्न आणि समन्वयाचे महत्व प्राचार्य डॉ.ए.बी. कुलकर्णी यांनी प्राध्यापकांसमोर विषद केले.
या चर्चासत्राचे नियोजन व समन्वय वाणिज्य व संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ. जे.पी. भोसले, प्रा. शंतनू ठाकरे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. एस.डी. टाकळकर, प्रा.डॉ. अनुराधा घुमटकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आकाश कांबळे, डॉ. विनोद पाटे, डॉ. आबा जगदाळे यांनी केले.
या चर्चासत्र यशस्वी करण्याकामी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त-मा. प्रकाश पाटे, विश्वस्त मोनिकाताई मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, कार्यवाह-रविंद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर आणि प्राचार्य डॉ.ए.बी. कुलकर्णी मार्गदर्शन मिळाले.



