नारायणगाव प्रतिनिधी
ग्रामपंचायत येडगाव, थिंक गुड फाउंडेशन व रॉयल ऑटो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने येडगाव येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला. यात येडगाव परिसरात विविध प्रकारच्या २५०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास व जागतिक तापमान वृद्धी याला आळा बसावा म्हणून ही संकल्पना राबविण्यात आली आहे. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक बाबाजी नेहरकर, लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे विद्यमान सचिव सह्याद्री भिसे, ग्रामपंचायत सरपंच सुजाता जाधव,उपसरपंच अजित नेहरकर, माजी उपसरपंच हर्षल गावडे सर्व ग्रामपंचायत सदस्य,रॉयल ऑटो कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात आला.




