नारायणगाव प्रतिनिधी
ब्लूमिंगडेल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार अतुल बेनके, खजिनदार गौरी बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात ऋषिवर्य महर्षी व्यासांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. हितेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीआणि विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी प्रत्येक गुरुशिक्षकांची ओळख, गुरुप्रती असणारा आदर प्रोत्साहन पर गीतांमधून दिला. विद्यार्थ्यांनी गुरुवर्य शिक्षकांना अवार्ड, गुलाब पुष्प व क्राऊन देत त्यांना सन्मानित केले.काही विद्याथ्यांनी गुरु महिमा नृत्यामधून सादर करत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे औक्षण करून गुरुप्रती आदर व्यक्त केला.शिष्याला भवसागरातून पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुपाशीच असते. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु हह्यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य जनांस समजणारे नसते. “शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ’ असतो असे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे मुख्याध्यापक डॉ. हितेश शर्मा यांनी केले. याशिवाय दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना नियोजनाचा बादशहा म्हणत त्यांचा मुख्याध्यापकांनी गुणगौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दूर्वा वारवे या विद्यार्थिनीने केले. आरुष कर्पे, अधिराज वायाळ, दिक्षा जोरडार, त्रयी सोमवंशी, ऑलिया शेख या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी हुमायरा शेख हिने मानले.




