नारायणगाव प्रतिनिधी
रोटरी क्लब नारायणगावचा पदाधिकार स्वीकार समारंभ रोटरी क्लबचे नियोजित प्रांतपाल चारूचंद्र श्रोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच नारायणगाव येथे उत्साहात पार पडला. यावेळी रोटरी वर्ष २०२५-२६ च्या अध्यक्षपदाचा अधिकार स्वप्नील जुत्ररकर यांनी मावळते अध्यक्ष हेमंत महाजन यांचेकडून स्वीकारला. प्रशांत ब्रह्मे यांनी क्लबच्या सचिवपदाचा व नविन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनीही पदभार स्वीकारला.या समारंभासाठी सन्माननीय अतिथी म्हणून माजी आमदार अतुल बेनके, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, विद्धस्त प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, सहकार्यवाह अरविंदभाऊ मेहेर, नारायणगावच्या सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, वारूळवाडी गावचे सरपंच विनायक भुजबळ, उपसरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, आशिष माळवदकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, उपप्रांतपाल धनंजय राजूरकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा समृद्धी किरण वाजगे, अंजली अभय खैरे, विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. रोटरी क्लबच्या गतवर्षातील प्रकल्प आणि कार्यक्रमांचा आढावा मावळते अध्यक्ष हेमंत महाजन यांनी घेतला. तसेच या वर्षातील महत्त्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.यामध्ये वेस्ट रोटेरियन मंगेश मेहेर, बेस्ट रोटरी अन अमृता भिडे, बेस्ट रोटरी कपल अमित बेनके व धनश्री बेनके, बेस्ट प्रोजेक्ट डायरेक्टर प्रशांत ब्रह्मे, बेस्ट कम्युनिटी प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. योगेश पाटील यांना पुरस्कार देण्यात आले. वर्षातील महत्त्वाचा पुरस्कार व्होकेशनल एक्सलंस अवार्ड ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांना प्रदान करण्यात आला. स्पेशल रिकग्निशनयोगेश भिडे आणि सचिन घोडेकर यांना देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. पदाधिकार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष स्वप्नील जुन्नरकर यांनी या वर्षातील नियोजित प्रकल्प आणि कार्यक्रमांचा आढावा सादर केला. तसेच या वर्षातील बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची ओळख करून दिली.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपसरपंच बाबू पाटे यांनी रोटरीच्या निरपेक्ष कार्याचा जगभर असलेला विस्तार सांगून रोटरीच्या कामाचे कौतुक केले. पदाधिकार स्वीकार समारंभयशस्वी करण्यासाठी डॉ. सविता भोसले, मंगेश मेहेर आणि ज्ञानेश्वर लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन घोडेकर व अमृता भिडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रसाद बांगर यांनी मानले.



