मंचर दिनांक – 27 मे 2026
सध्या राज्यभर सुरू असलेल्या शासकीय जनगणनेच्या कामात कर्तव्य बजावत असताना एका शिक्षिकेच्या दुचाकीला कंटेनरने दिलेल्या धडकेत प्राथमिक शिक्षिका दिपाली सुजित तांबे(रा. मंचर)यांचा जागीच मृत्यू झाला आहे.आज बुधवार दिनांक 27 मे रोजी कान्हे फाटा ( ता.मावळ) येथेही घटना घडली आहे. त्या सध्या अहिरवडे येथे कार्यरत होत्या व एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. मिळालेल्या प्राथमिक माहिती अनुसार दिपाली सुजित तांबे या मूळच्या राहणाऱ्या मंचर येथील असून सध्या त्या अहिरवडे परिसरात शासकीय जनगणनेचे काम करत होत्या. सकाळी आपले जनगणनेचे कर्तव्य बजावत असताना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर ने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अहिरवडे येथे कार्यरत होण्यापूर्वी त्यांनी निगडे व नायगाव या शाळांमध्ये आपले ज्ञानदानाचे कार्य केले. यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे मंचर व मावळ तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे.




















